शिक्षाव्रते
शिक्षाव्रते ही श्रावकाला (गृहस्थाला) मुनींच्या पूर्ण संयमी जीवनाचा सराव किंवा "शिक्षण" देणारी व्रते आहेत. अणुव्रते आणि गुणव्रतांनंतर ही व्रते श्रावकाच्या आध्यात्मिक प्रगतीला वेग देतात.
देशावकाशिकं च प्रोषधोपवासो भोगोपभोगपरिमाणम् ।
अतिथिसंविभागश्चेति शिक्षाव्रतानि चत्वारि ॥ - रत्नकरण्ड श्रावकाचार गाथा ९१
- स्वरूप: दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ (किंवा किमान एक वेळ) एकांत व शांत ठिकाणी बसून सर्व पापकर्मांचा त्याग करून आत्मचिंतन करणे.
- कालावधी: किमान १ अंतर्मुहूर्त (४८ मिनिटे) शांतचित्ताने सामायिक करणे.
- पद्धत: सर्व कौटुंबिक व व्यावहारिक चिंता बाजूला ठेवून, शत्रुत्व व मित्रत्वाच्या पलीकडे जाऊन सर्व जीवांबद्दल समभाव (साम्यभाव) बाळगणे आणि पञ्चपरमेष्ठींचे ध्यान किंवा जप करणे.
- महत्त्व: सामायिक करत असताना गृहस्थ काही काळासाठी सर्व पाप आणि परिग्रहाचा त्याग करतो; त्यामुळे त्या ४८ मिनिटांत तो मुनींसमान मानला जातो.
- स्वरूप: प्रत्येक महिन्याच्या अष्टमी आणि चतुर्दशी या पर्वतिथींना उपवास करून धर्मध्यान करणे.
- विधि (कालावधी): हा नियम १६ प्रहरांचा (२ दिवसांचा) मानला जातो. सप्तमीच्या दुपारापासून आरंभी कामे सोडून, अष्टमीला पूर्ण उपवास (अन्न-पाण्याचा त्याग) करून, आणि नवमीच्या सकाळी पारणे (आहार) करून हा काळ पूर्ण केला जातो.
- उद्दिष्ट: शरीराचे चोचले पुरवणे थांबवून आत्मिक शक्ती वाढवणे आणि इंद्रियांवर विजय मिळवणे.
- संसारी जीवनात रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे दोन प्रकार असतात:
- भोग: ज्या वस्तूंचा एकदाच वापर केला जातो (उदा. अन्न, पाणी, मिठाई).
- उपभोग: ज्या वस्तूंचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो (उदा. कपडे, दागिने, घर, वाहन).
- स्वरूप: या भोग आणि उपयोगाच्या वस्तूंचा दररोज सकाळी उठल्यावर कालावधी व प्रमाणाची मर्यादा आखून घेणे.
- उदा.: "आज मी फक्त २ प्रकारच्या भाज्या खाईन", "आज मी ४ जोड कपड्यांपेक्षा जास्त वापरणार नाही" किंवा "आज अमुक पदार्थाचा त्याग".
- महत्त्व: यामुळे अनावश्यक तृष्णा, लोभ आणि वस्तूंवरील आसक्ती कमी होते.
- स्वरूप: स्वतः भोजन करण्यापूर्वी घरात आलेल्या निष्पाप, त्यागी, व्रती किंवा संयमी मुनींना/अतिथींना आदराने व शुद्ध भावाने आहार, औषध, ज्ञान किंवा निवारा (अभय) देणे.
- 'अतिथी' शब्दाचा अर्थ: ज्याच्या येण्याची कोणतीही तिथी, वेळ किंवा तारीख निश्चित नसते, असा निस्पृह त्यागी/मुनी.
- आहारदानाची नवधा भक्ति: मुनींना आहार देताना ९ प्रकारच्या भक्तींचे (पडगाहन, उच्च आसन देणे, चरण प्रक्षालन, पूजन, नमस्कार, मन-वचन-कायेची शुद्धता आणि आहार शुद्ध असणे) पालन केले जाते.