तीर्थंकरांचे पिता

तीर्थंकरांचे पिता हे अत्यंत पुण्यवान, प्रभावशाली आणि उच्च कुळातील राजे मानले जातात. ६३ आणि १६९ शलाका पुरुषांच्या गणनेत त्यांचा सन्मानाने समावेश केला जातो. तीर्थंकरांचा जन्म हा नेहमी अतिशय पवित्र आणि समृद्ध राजवंश कुळात (प्रामुख्याने इक्ष्वाकु किंवा उग्र वंशात) होतो.

२४ तीर्थंकरांच्या पित्यांची यादी

क्रमतीर्थंकरांचे नावपित्याचे नावराज्य / नगरी
भगवान ऋषभदेव (आदिनाथ)नाभीराय (नाभीनंद)अयोध्या
भगवान अजितनाथजितशत्रूअयोध्या
भगवान संभवनाथजितारीश्रावस्ती
भगवान अभिनंदननाथसंवरअयोध्या
भगवान सुमतीनाथमेघप्रभ (मेघाय)अयोध्या
भगवान पद्मप्रभधरण (धरेश)कौशांबी
भगवान सुपार्श्र्वनाथसुप्रतिष्ठ (प्रतिष्ठ)वाराणसी
भगवान चंद्रप्रभमहासेनचंद्रपुरी
भगवान पुष्पदंत (सुविधीनाथ)सुग्रीवकाकंदी
१०भगवान शीतलनाथदृढरथभद्रिकपूर
११भगवान श्रेयंसनाथविष्णू (विष्णुराज)सिंहपुरी
१२भगवान वासुपूज्यवसुपूज्यचंपापूरी
१३भगवान विमलनाथकृतवर्माकंपिला
१४भगवान अनंतनाथसिंहसेनअयोध्या
१५भगवान धर्मनाथभानू (भानूराज)रत्नपुरी
१६भगवान शांतीनाथविश्वसेनहस्तिनापूर
१७भगवान कुंथुनाथसूर (शूरसेन)हस्तिनापूर
१८भगवान अरहनाथसुदर्शनहस्तिनापूर
१९भगवान मल्लीनाथकुंभ (कुंभराज)मिथिला
२०भगवान मुनिसुव्रतनाथसुमित्रराजगृह
२१भगवान नमीनाथविजयमिथिला
२२भगवान नेमीनाथसमुद्रविजयशौरीपूर / द्वारका
२३भगवान पार्श्वनाथअश्वसेनवाराणसी
२४भगवान महावीरसिद्धार्थक्षत्रियकुंड / वैशाली
विशेष नोंद: प्रथमाचार्य नाभीराय (भगवान ऋषभदेवांचे पिता) हे या अवसर्पिणी कालचक्रातील अंतिम कुलकर (मनू) मानले जातात. त्यांनीच मानवी समाजाला जीवन जगण्याच्या मूलभूत कला (कृषी, असि, मसि इत्यादी) शिकवण्यास सुरुवात केली.

कुलकर म्हणजे काय?
भोगभूमी समाप्त होऊन जेव्हा कर्मभूमीची सुरुवात होत होती, तेव्हा निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे घाबरलेल्या मानव समाजाला जीवन जगण्याची कला (शेती, अग्नीचा वापर, राहणीमान, व्यवस्था) शिकवणाऱ्या महान मार्गदर्शकांना कुलकर किंवा मनू म्हटले जाते.
अवसर्पिणी कालचक्राच्या तिसऱ्या कालाच्या शेवटी एकूण १४ कुलकर जन्म घेतात.  
१४ कुलकर: 
प्रतिश्रुति, सन्मति, क्षेमंकर, क्षेमंधर, सीमंकर, सीमंधर, विमलवाहन, चक्षुष्मान, यशस्वी, अभिचंद्र, चंद्राभ, मरुदेव, प्रसेनजित आणि नाभिराज (भगवान ऋषभदेवांचे पिता). 

अजून काही नाही

लवकरच अधिक माहिती जोडली जाईल.

🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान