युक्त्यनुशासन
युक्त्यनुशासन हा समंतभद्राचार्यांनी रचलेला एक महत्त्वपूर्ण दार्शनिक ग्रंथ असून त्यात स्याद्वाद व अनेकान्तवाद यांच्या आधारे जैन तत्त्वज्ञानाची युक्तिपूर्ण मांडणी केली आहे. या ग्रंथात आचार्यांनी परमागम, जिनेन्द्रदेव व जैन सिद्धान्तांचे तार्किक समर्थन करताना परमत-खंडन व स्वमत-स्थापन या पद्धतीचा उपयोग केला आहे. दिगंबर परंपरेत या ग्रंथाला विशेष आदरणीय स्थान असून समंतभद्राचार्य हे आप्तमीमांसा व रत्नकरण्डश्रावकाचार यांसारख्या ग्रंथांचेही कर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.