अविपाक निर्जरा
कर्माचा काळ (उदय) येण्यापूर्वीच आत्मज्ञानाने आणि तपाच्या अग्नीने कर्मांना नष्ट करण्याच्या प्रक्रियेला अविपाक निर्जरा म्हणतात.
अविपाक निर्जरे चे अकाम निर्जरा आणि सकाम निर्जरा अशे दोन भेद आहेत:
अकाम निर्जरा:
- व्याख्या: जिथे जीव स्वतःच्या इच्छेने किंवा आत्मज्ञानाने तप करत नाही, परंतु परिस्थितीमुळे, लाचारीने, भीतीने किंवा अज्ञानाने शारीरिक व मानसिक कष्ट समतेने सहन करतो.
- स्वरूप:उदा. गरिबीमुळे खायला न मिळणे (इच्छेशिवाय झालेला उपवास).
- आजारपणात किंवा तुरुंगात असताना मिळणारा शारीरिक त्रास मुकाट्याने सहन करणे.
- अज्ञानात किंवा चुकीच्या मान्यतेपोटी शरीराला तीव्र कष्ट देणे (बालतप).
- परिणाम: याने कर्मांची काही प्रमाणात गळती (निर्जरा) नक्कीच होते आणि जीव नरक/तिर्यंच गतीतून सुटून अल्प काळासाठी देव गतीत जाऊ शकतो, परंतु याने मोक्ष मिळत नाही (कारण मागे आत्मज्ञान व सम्यग्दर्शन नसते).
- व्याख्या: आत्मज्ञानाने प्रेरित होऊन, सम्यग्दर्शनासह स्वतःच्या इच्छेने (विवेकाने) कर्मांचा नाश करण्यासाठी केलेले तप, संयम आणि ध्यान.
- स्वरूप:सम्यग्दृष्टी श्रावक किंवा मुनिराजांनी कर्मांचा नाश करण्यासाठी स्वतःहून घेतलेले उपवास, रसपरित्याग, स्वाध्याय आणि ध्यान.दुःखाच्या प्रसंगी "हा माझ्या पूर्वकर्माचा उदय आहे" असा भेदज्ञानाचा विचार करून आत्मस्वरूपात स्थिर राहणे.
- परिणाम: ही निर्जरा कर्मांना मुळासकट जाळून टाकते आणि थेट मोक्षाकडे घेऊन जाते.
- ही निर्जरा केवळ सम्यग्दृष्टी आणि आत्मध्यानात लीन असलेल्या साधकांनाच होते. हीच खरी मोक्षाचे कारण असणारी निर्जरा आहे.
निर्जरेचे मुख्य साधन: १२ प्रकारचे तप
आचार्य उमास्वामी यांनी तत्त्वार्थ सूत्र (अध्याय ९, सूत्र १९) मध्ये निर्जरेसाठी ६ बाह्य आणि ६ अभ्यंतर असे एकूण १२ तप सांगितले आहेत:
अनशनावमौदर्यवृत्तिपरिसंख्यानरसपरित्यागविविक्तशय्यासनकायक्लेशा बाह्यंतपः ॥१९॥
प्रायश्चित्तविनयवैय्यावृत्यस्वाध्यायव्युत्सर्गध्यानान्युत्तरम् ॥२०॥
६ बाह्य तप (शरीराशी संबंधित बाह्य नियम):
- अनशन: उपवास करणे (अन्न-पाण्याचा त्याग करणे).
- अवमौदर्य (ऊनोदर): भुकेपेक्षा कमी अन्न ग्रहण करणे (इंद्रियावर नियंत्रण ठेवण्यासाठी).
- वृत्तिपरिसंख्यान: आहाराला निघताना मनात कडक नियम किंवा संकल्प धरूनच (उदा. अमूक दाताराने अमूक वस्तू दिली तरच आहार घेईन) आहार स्वीकारणे.
- रसपरित्याग: दूध, दही, तूप, तेल, साखर/गूल आणि मीठ या ६ रसांपैकी एका किंवा सर्वांचा त्याग करणे.
- विविक्त शय्यासन: एकांत, शांत आणि पाशवी/स्त्री-पुरुषांच्या कोलाहलापासून दूर असलेल्या पवित्र ठिकाणी निवास करणे.
- कायक्लेश: शरीराच्या मोहाचा त्याग करून शीत, उष्णता इत्यादी परिषहांचा (कष्टांचा) समताभावाने स्वीकार करणे.
- प्रायश्चित्त: स्वतःकडून झालेल्या अनवधानाच्या चुका गुरुंसमोर निष्कपट्टपणे कबूल करून स्वतःला शुद्ध करणे.
- विनय: देव, शास्त्र, गुरू, ज्ञान आणि चरित्राचा मनापासून आदर करणे.
- वैयावृत्य: वृद्ध, आजारी, तपस्वी मुनिराजांची आणि साधकांची निष्काम सेवासुश्रूषा करणे.
- स्वाध्याय: जिनवाणी ग्रंथांचे वाचन, वाचन-पुच्छना (शंका निरसन), अनुप्रेक्षा (चिंतन), आम्राय (उजळणी) आणि धर्मोपदेश करणे.
- व्युत्सर्ग: शरीरावरील, परिग्रहावरील आणि विकारांवरील ममत्वाचा (माझेपणाचा) पूर्ण त्याग करणे.
- ध्यान: सर्वोच्च तप! आत्म स्वरूपावर मनाला एकाग्र करणे (विशेषतः शुक्लध्यान). या ध्यानात निर्जरा सर्वात तीव्र गतीने होते.
आगम ग्रंथ संदर्भ
अनशनावमौदर्यवृत्तिपरिसंख्यानरसपरित्यागविविक्तशय्यासनकायक्लेशा बाह्यंतपः ॥१९॥ प्रायश्चित्तविनयवैय्यावृत्यस्वाध्यायव्युत्सर्गध्यानान्युत्तरम् ॥२०॥
तत्त्वार्थसूत्र