वीतराग आरती (वीतराग जिन । दीपार्चन हे,)
वीतराग जिन । दीपार्चन हे,
मंगल तव चरणी, अर्पण तव चरणीं ।
शांतीसुधेच्या मधुरा स्वादा, देते दिनरजनी ॥ धृ. ||
अगण्य गुणगणप्रभा जीवांच्या,
नशवि मोहाते, ज्ञानामृत देते ।
सकल जीवांते शिवपुरमार्गा, प्रेमे दर्शविते ॥ १ ॥
शुभ भवांची ज्योत तेवूनी, भक्तिरुपी धृत ते ॥ भक्ति ||
ओतुनि प्रमेकरिता आरती, स्वगुणा प्रगटविते ॥ २ ॥