नमिनाथ

पिता: विजय · माता: वप्रादेवी
कुळ: इक्ष्वाकु · आयुष्य: १०,००० वर्ष
प्रकार: तीर्थंकर
नमिनाथ हे एकविसावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा विजय व माता वप्रादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे मिथिला नगरीत झाले व  ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.
प्रमुख विवरण व परिचय:
माता-पिता: पिता राजा विजय (विजयांग) आणि माता राणी वप्रा (गुह्यश्री)
वंश: इक्ष्वाकु वंश
चिन्ह / लांछन: निल कमळ 
वर्ण (रंग): सुवर्ण (सोनेरी / पिवळा)
केवली वृक्ष: बकुळ वृक्ष (किंवा चंपक/अशोक)
आयुष्यमान: १०,००० वर्षे
शरीरमान (उंची): १५ धनुष्य (सुमारे ४५ मीटर)
पूर्वभव (मागील जन्म)
जैन पुराणांनुसार (विशेषतः उत्तरपुराण), तीर्थंकर होण्यापूर्वी भगवान नमिनाथ यांचा जीव धातकीखंड द्वीपातील 'सुसीमा' नगरीचा राजा सिद्धार्थ होता. त्यांनी अतिशय धार्मिक वृत्तीने राज्यकारभार केला आणि नंतर वैराग्य प्राप्त करून मुनी दीक्षा घेतली. कठोर तपश्चर्या आणि १६ भावनांचे उत्कृष्ट चिंतन करून त्यांनी 'तीर्थंकर नाम-गोत्र' कर्माचे बंध केले. त्यानंतर अपराजित विमानात देव म्हणून जन्म घेऊन तेथून त्यांनी मिथिलापुरीत जन्म  घेतला.
नावामागील कथा व महत्त्व
भगवान नमिनाथ गर्भात असताना मिथिलापुरीवर शेजारच्या अनेक राजांचे आक्रमण झाले होते. परंतु बालकाच्या पुण्यामुळे आणि मातेच्या प्रभावामुळे आक्रमक राजे युद्धाऐवजी स्वयं नम्र झाले आणि त्यांनी राजा विजया समोर आत्मसमर्पण (नमन) केले. शत्रूंना नमवणारे आणि सर्वांना नम्र बनवणारे असल्यामुळे या बालकाचे नाव 'नमिनाथ' ठेवण्यात आले.
राजा म्हणून कार्य आणि वैराग्य
  • भगवान नमिनाथ यांनी सुमारे २,५०० वर्षे मिथिलापुरीचे राजा म्हणून राज्य सांभाळले. 
  • एके दिवशी त्यांनी ऋतू बदलाच्या वेळी निसर्गात होणारे बदल (सुकलेली पाने, कोमेजलेली फुले) पाहिले आणि त्यांना संसाराच्या अनित्यतेची जाणीव झाली. त्यांनी लगेचच आपल्या पुत्राचा 'सुप्रभ' याचा राज्याभिषेक केला आणि 'उत्तमशिबिका' नावाच्या पालखीत बसून सहस्राम्र वनात जाऊन दीक्षा घेतली.
केवलज्ञान आणि धर्मप्रभावना
  • दीक्षेनंतर अवघ्या ९ महिन्यांत त्यांनी घातिया कर्मांचा क्षय करून केवलज्ञान प्राप्त केले.
  • समवसरण उपदेश: त्यांनी आपल्या समवसरणात प्रजेला कषाय (क्रोध, मान, माया, लोभ) यांवर विजय मिळवण्याचा मार्ग दाखवला.
  • आत्मा आणि शरीराचा भेद: त्यांनी उपदेश दिला की, बाह्य शत्रूंना जिंकण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनातील विकारांना जिंकणे हाच खरा धर्म आहे.
  • मुख्य गणधर: सुप्रभ (एकूण १७ गणधर)
  • शासंदेव (यक्ष व यक्षी): दिगंबर परंपरेनुसार 'मातंग यक्ष' आणि 'अपराजिता देवी' (यक्षी).
  • मुनी व साध्वी संघ: त्यांच्या धर्मसंघात सुमारे २०,००० मुनी (साधू) आणि ४१,००० आर्यिका (साध्वी) होत्या.
चिन्ह: नील कमळ

पंच कल्याणक

कल्याणकस्थानतिथी
गर्भ कल्याणकमिथिला (बिहार/नेपाळ सीमाभाग)आश्विन शुक्ल पूर्णिमा
जन्म कल्याणकमिथिला (बिहार/नेपाळ सीमाभाग)आषाढ कृष्ण एकादशी
दीक्षा (तप) कल्याणकमिथिला (बिहार/नेपाळ सीमाभाग)आषाढ कृष्ण एकादशी
केवलज्ञान कल्याणकमिथिला (बिहार/नेपाळ सीमाभाग)मार्गशीर्ष शुक्ल एकादशी
मोक्ष कल्याणकश्री सम्मेद शिखरजी (झारखंड)वैशाख कृष्ण दशमी
निर्वाण आसन: Padmasana
चैत्य वृक्ष: बकुळ वृक्ष (किंवा चंपक/अशोक)
गणधर संख्या: 17 · मुख्य गणधर: सुप्रभ
पुढे: नेमिनाथ
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान