भट्टारक ज्ञानभूषण
भट्टारक ज्ञानभूषण हे मूलसंघ-बलात्कारगणातील, भट्टारक सकलकीर्ती यांच्या परंपरेतील विद्वान भट्टारक होते (भट्टारक भुवनकीर्ती यांचे शिष्य). त्यांनी इ.स. १५०३ (वि.सं. १५६०) च्या सुमारास 'तत्त्वज्ञान तरंगिणी' हा 'शुद्ध चिद्रूप' केंद्रस्थानी असलेला संस्कृत अध्यात्म ग्रंथ रचला. त्यांच्या शिष्यपरंपरेत पुढे भट्टारक शुभचंद्र यांच्यासारखे विद्वान झाले.
प्रमुख ग्रंथ: तत्त्वज्ञान तरंगिणी; याशिवाय काही पूजा व स्तोत्र रचना त्यांच्या नावे आढळतात.
रचलेले आगम ग्रंथ
तत्त्वज्ञान तरंगिणी
भट्टारक ज्ञानभूषण विरचित हे ग्रंथ शुद्ध चिद्रूपाच्या स्वरूपाचे व प्राप्तीचे मार्गदर्शन करणारे अध्यात्मिक काव्य आहे.