सोमदेवाचार्य
आचार्य सोमदेवसूरी हे देवसंघातील आचार्य नेमिदेव यांचे शिष्य होते. राष्ट्रकूट सम्राट कृष्ण (तृतीय) यांच्या काळात, त्यांचे मांडलिक चालुक्य राजा बद्दिग (द्वितीय) यांच्या राजधानीत त्यांनी इ.स. ९५९ मध्ये 'यशस्तिलक-चंपू' हे गद्य-पद्य मिश्र महाकाव्य पूर्ण केले. त्यातील शेवटचे तीन आश्वास 'उपासकाध्ययन' म्हणून स्वतंत्र श्रावकाचार ग्रंथ मानले जातात.
काव्य, तत्त्वचर्चा, अन्य दर्शनांचे परीक्षण आणि राजनीती अशा अनेक क्षेत्रांत ते निपुण होते; त्यांचा 'नीतिवाक्यामृत' हा कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या परंपरेतील राजनीतीवरील सूत्रग्रंथ आहे.
प्रमुख ग्रंथ: यशस्तिलक-चंपू (उपासकाध्ययन), नीतिवाक्यामृत, अध्यात्मतरंगिणी.
रचलेले आगम ग्रंथ
उपासकाध्ययन
उपासकाध्ययन हा सोमदेवाचार्यांनी रचलेला एक महत्त्वपूर्ण दिगंबर जैन ग्रंथ असून यात श्रावकाच्या आचारधर्माचे सविस्तर विवेचन केले आहे.