बारसणुपेक्खा
बारसणुपेक्खा हा आचार्य कुन्दकुन्दविरचित प्राकृत भाषेतील एक प्रमुख दिगम्बर जैन ग्रंथ आहे. हा ग्रंथ अवघ्या ९१ गाथांचा संक्षिप्त ग्रंथ आहे व त्यात मोक्षमार्गावर चिंतन करण्यासाठी उपयुक्त बारा अनुप्रेक्षांचे दैनंदिन स्वाध्यायासाठी आणि १२ भावनांचे सार पटापट समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. यात प्रत्येक भावनेचे (उदा. अनित्य, अशरण, संसार इ.) मूळ स्वरूप ३ ते ७ गाथांमध्ये सूत्ररूपाने स्पष्ट केले आहे. १२ भावनांचे मूळ सूत्ररूपाने (संक्षिप्त) वर्णन आणि वैराग्य भावना.
अध्रुव, अशरण, एकत्व, अन्यत्व, संसार, लोक, अशुचित्व, आस्रव, संवर, निर्जरा, धर्म आणि बोधिदुर्लभ अशा बारा भावनांचा समावेश या ग्रंथात आहे.