द्रव्यास्त्रव

मिथ्यात्वादि च्या कारणाने जी पुद्गल कार्माण वर्गणा येते, ती द्रव्यास्रव आहे.
पुद्गलकर्माचे येणे जीवाच्या योग कषाय रूप परिणामांचे निमित्त असतांना कार्माण वर्गणा रूप सूक्ष्म पुद्गल कर्मरूप बनते. 
द्रव्यास्रवाचे विस्ताराने १४८ भेद आहेत - ज्ञानावरण ५, दर्शनावरण ९, वेदनीय २, मोहनीय २८, आयु ४, नाम ९३, गोत्र २ आणि अन्तराय ५ च्या भेदाने १४८ प्रकारचा आहे. 


आगम ग्रंथ संदर्भ

णाणावरणादीणं, जोग्गं जं पुग्गलं समासवदि दव्वासवो च णेओ, अणेयभेयो जिणक्खादो ॥31॥

पुढे: स्वामी अपेक्षा
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान