उत्पाद-व्यय-ध्रौव्य

जैन दर्शनात पदार्थाला सत् म्हटले गेले आहे. सत् हे द्रव्याचे लक्षण आहे. हे उत्पाद-व्यय-ध्रौव्य लक्षण वाले आहे. 
जगातील प्रत्येक पदार्थ परिणमनशील आहे. सारे विश्व परिवर्तनाच्या प्रवाहात वाहत चालले आहे. जेथे जेथे आपली दृष्टी जाते तेथे सर्व काही बदलत आहे. 
ते पहा! समोर झाड उभे आहे, त्यात कोंब फुटत आहेत, पाने वाढत आहेत, ती गळत आहेत, प्रतिक्षणी ते आपली जुनी अवस्था सोडून नित नवीन रूप धारण करत आहे. बालक युवा होत आहे, युवा वृद्ध होत आहे, वृद्ध मरत आहे. सर्वत्र परिवर्तनच परिवर्तन आहे. मग जड असो वा चेतन, सर्व या परिवर्तनाच्या प्रवाहात वाहत चालले आहेत. 

प्रत्येक पदार्थ विश्वाच्या रंगमंचावर प्रतिक्षणी नवे रूप घेऊन येत आहे. तो आपली जुनी अवस्था सोडतो, नवीन धारण करतो. जुन्याचा विनाश आणि नव्याची उत्पत्ती हाच या परिवर्तनाचा आधार आहे. कच्च्या आंब्याचे पिकणे हेच तर आंब्याचे परिवर्तन आहे. बालकाचे युवा होणे, युवाचे वृद्ध होणे हेच तर माणसाचे परिवर्तन आहे. 

जुन्या अवस्थेच्या विनाशाला व्यय म्हणतात आणि नव्या अवस्थेच्या उत्पत्तीला उत्पाद.व्याची उत्पत्ती आणि जुन्याचा विनाश झाल्यानंतरही द्रव्य आपली मौलिकता गमावत नाही. कच्चा आंबा बदलून पिकला तरी तो आपला आंबेपणा गमावत नाही. बालक भले वृद्ध झाले तरी मनुष्यत्व बदलत नाही. या मौलिक स्थितीचे नाव ध्रौव्य आहे, जे प्रतिक्षणी परिवर्तित होत राहिल्यानंतरही पदार्थात समरूपता टिकवून ठेवते. 

अशा प्रकारे प्रत्येक पदार्थ उत्पाद-व्यय-ध्रौव्य लक्षण वाला आहे. जगातील कोणताही पदार्थ याला अपवाद नाही. जुन्या अवस्थेचा विनाश आणि नव्याची उत्पत्ती दोन्ही एकत्र होतात, प्रकाश येताच अंधार नाहीसा होतो. यांत कोणताही कालभेद नाही. हे परिवर्तन प्रतिक्षणी होत आहे, ही गोष्ट वेगळी आहे की सूक्ष्म असल्यामुळे ते आपल्या आकलनाच्या बाहेर आहे.

आगम ग्रंथ संदर्भ

दव्वं सल्लक्खणियं उप्पादव्वय धुवत्त संजुत्तं। गुण पज्जयासयं वा जं तं भण्णंति सव्वण्हु।।१०।। अर्थात् भगवान जिनेन्द्र द्रव्याचे लक्षण सत् सांगतात, ते उत्पाद, व्यय आणि ध्रौव्याने युक्त आहे अथवा जे गुण आणि पर्यायांचे आश्रयस्थान आहे, ते द्रव्य आहे.

पञ्चास्तिकाय

“उत्पाद युक्तं सत् द्रव्य लक्षणं”

पुढे: द्रव्य गुण
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान