विमलनाथ
विमलनाथ हे तेरावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा कृतवर्मा व माता जयश्यामादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे कांपिल्यपुरव नगरीत झाले व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.
प्रमुख विवरण व परिचय
गर्भात असताना मातेच्या मनात अत्यंत निर्मळ (विमल) आणि पवित्र विचार निर्माण झाले. तसेच, त्यांच्या जन्माने राज्यातील प्रजेची मने निर्मळ झाली आणि बुद्धी तीक्ष्ण/विमल झाली, म्हणून त्यांचे नाव विमलनाथ ठेवण्यात आले.
धर्मसंघ व शासंदेव
मुख्य गणधर: मंदार (एकूण ५५ गणधर)
शासंदेव (यक्ष-यक्षी):'षण्मुख यक्ष आणि वैरोटी देवी (यक्षी).
प्रमुख विवरण व परिचय
- जन्मस्थान: कंपिला / कांपिल्यजी (सध्याचे फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश)
- माता-पिता: पिता राजा कृतवर्मा आणि माता राणी जयश्यामा (श्यामा)
- वंश: इक्ष्वाकु वंश
- चिन्ह / लांछन: डुक्कर / रानडुक्कर (सूकर)
- वर्ण (रंग): सुवर्ण (सोनेरी / पिवळा)
- केवली वृक्ष: जांभूळ वृक्ष (जंबू वृक्ष)
- आयुष्यमान: ६० लाख वर्षे
- शरीरमान (उंची):६० धनुष्य
गर्भात असताना मातेच्या मनात अत्यंत निर्मळ (विमल) आणि पवित्र विचार निर्माण झाले. तसेच, त्यांच्या जन्माने राज्यातील प्रजेची मने निर्मळ झाली आणि बुद्धी तीक्ष्ण/विमल झाली, म्हणून त्यांचे नाव विमलनाथ ठेवण्यात आले.
धर्मसंघ व शासंदेव
मुख्य गणधर: मंदार (एकूण ५५ गणधर)
शासंदेव (यक्ष-यक्षी):'षण्मुख यक्ष आणि वैरोटी देवी (यक्षी).
पंच कल्याणक
| कल्याणक | स्थान | तिथी |
|---|---|---|
| गर्भ कल्याणक | कांपिल्यपुर | ज्येष्ठ कृष्ण दशमी |
| जन्म कल्याणक | कांपिल्यपुर | माघ शुक्ल तृतीया |
| दीक्षा (तप) कल्याणक | कांपिल्यपुर | माघ शुक्ल तृतीया |
| केवलज्ञान कल्याणक | कांपिल्यपुर | माघ शुक्ल षष्ठी |
| मोक्ष कल्याणक | सम्मेदशिखर | आषाढ कृष्ण अष्टमी |