कला क्षेत्र

कला क्षेत्र
वेरूळ लेणी (महाराष्ट्र)
युनेस्को जागतिक वारसा स्थळ वेरूळ लेण्यांमध्ये ३० ते ३४ क्रमांकाची पाच दिगंबर जैन लेणी असून त्यांतील इंद्रसभा (गुहा क्र. ३२) हे कैलास मंदिराची लघुप्रतिकृती मानले जाणारे सर्वांत भव्य जैन लेणे आहे.

कला क्षेत्र
खजुराहो (मध्य प्रदेश)
जागतिक वारसा स्थळ खजुराहो येथील पूर्व मंदिर समूहात पार्श्वनाथ, आदिनाथ व शांतिनाथ या दहाव्या शतकातील भव्य दिगंबर जैन मंदिरांचा समावेश आहे.

कला क्षेत्र
श्रवणबेळगोळ (कर्नाटक)
विंध्यगिरी व चंद्रगिरी या दोन टेकड्यांमध्ये वसलेले श्रवणबेळगोळ हे गोमटेश्वर बाहुबलींच्या ५७ फूट उंच एकाश्म मूर्तीसाठी व दर बारा वर्षांनी होणाऱ्या महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी जगप्रसिद्ध आहे.

कला क्षेत्र
मूडबिद्री (कर्नाटक)
कर्नाटकातील मूडबिद्री हे अठरा जैन बसदींसाठी 'दक्षिणेची जैन काशी' म्हणून ओळखले जाते; येथील जैन मठात श्रवणबेळगोळाहून हलवलेले प्राचीन धवला ग्रंथ जतन केलेले आहेत.