कल्याणक क्षेत्र
अयोध्या (उत्तर प्रदेश)
अयोध्या ही पाच तीर्थंकरांची - ऋषभदेव, अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतिनाथ व अनंतनाथ - जन्मभूमी व दीक्षाभूमी असून जैन परंपरेतील सर्वाधिक कल्याणक असलेले एकमेव नगर आहे.

श्रावस्ती (उत्तर प्रदेश)
प्राचीन कोसल राज्याची राजधानी श्रावस्ती ही तिसरे तीर्थंकर भगवान संभवनाथ यांची गर्भ, जन्म, तप आणि ज्ञान या चार कल्याणकांची भूमी आहे.
कौशांबी (उत्तर प्रदेश)
कौशांबी ही सहावे तीर्थंकर पद्मप्रभू यांची गर्भ, जन्म, दीक्षा व केवलज्ञान या चार कल्याणकांची भूमी आहे; येथेच भगवान महावीरांनी दीक्षेनंतर साडेपाच महिन्यांच्या कठोर अभिग्रहानंतर चंदनबालेच्या हस्ते पहिला आहार घेतला.

वाराणसी (उत्तर प्रदेश)
वाराणसी ही चार तीर्थंकरांची (सुपार्श्वनाथ, चंद्रप्रभू, श्रेयांसनाथ, पार्श्वनाथ) कल्याणक भूमी असून भेलूपुर येथे पार्श्वनाथांची तर भदैनी येथे सुपार्श्वनाथांची जन्मभूमी आहे.

चंद्रपुरी (उत्तर प्रदेश)
वाराणसीजवळ गंगा नदीकिनारी वसलेली चंद्रपुरी ही आठवे तीर्थंकर चंद्रप्रभू यांची गर्भ, जन्म, दीक्षा व केवलज्ञान या चार कल्याणकांची भूमी आहे.

काकंदी (बिहार)
काकंदी ही नववे तीर्थंकर सुविधिनाथ (पुष्पदंत) यांची गर्भ, जन्म, दीक्षा व केवलज्ञान या चारही कल्याणकांची भूमी आहे - अशा मोजक्या तीर्थस्थळांपैकी एक.
भद्रिकापुरी (बिहार/झारखंड सीमाभाग)
दहावे तीर्थंकर भगवान शीतलनाथ यांची जन्मभूमी भद्दिलपूर परकीय आक्रमणांमुळे सुमारे १५० वर्षे लुप्त झाली होती; सन १९९३ मध्ये संशोधनानंतर झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील इटखोरी येथे तिची पुन्हा ओळख पटली.

सिंहपुरी - सारनाथ (उत्तर प्रदेश)
सारनाथजवळील सिंहपुरी ही अकरावे तीर्थंकर भगवान श्रेयांसनाथ यांची गर्भ, जन्म, दीक्षा व केवलज्ञान या चार कल्याणकांची भूमी आहे.
कांपिल्यजी (उत्तर प्रदेश)
गंगेकाठी वसलेले प्राचीन कांपिल्य नगर हे तेरावे तीर्थंकर भगवान विमलनाथ यांची च्यवन, जन्म, दीक्षा व केवलज्ञान भूमी असून पांचाल नरेश द्रुपद यांची राजधानी व द्रौपदीची जन्मभूमीही होती.
रत्नपुरी (उत्तर प्रदेश)
अयोध्या-लखनौ महामार्गावर अयोध्येपासून सुमारे २४ किमी अंतरावरील रत्नपुरी ही पंधरावे तीर्थंकर भगवान धर्मनाथ यांची च्यवन, जन्म, दीक्षा व केवलज्ञान भूमी आहे.

हस्तिनापूर (उत्तर प्रदेश)
महाभारतकालीन कुरु राजधानी हस्तिनापूर ही शांतिनाथ, कुंथुनाथ व अरनाथ या तीन तीर्थंकर-चक्रवर्तींच्या एकूण बारा कल्याणकांची भूमी आहे; आर्यिका ज्ञानमती माताजींच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली जंबूद्वीप रचना येथील खास आकर्षण आहे.
मिथिला (बिहार/नेपाळ सीमाभाग)
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील मिथिला (सुरसंड) ही एकोणिसावे तीर्थंकर मल्लिनाथ यांची चार कल्याणकांची भूमी असून एकविसावे तीर्थंकर नमिनाथ यांचीही जन्मभूमी येथेच मानली जाते.

राजगृही (बिहार)
मगध सम्राट श्रेणिक (बिंबिसार) व जरासंधाची राजधानी राजगृही ही विसावे तीर्थंकर मुनिसुव्रतनाथ यांची गर्भ, जन्म, तप व ज्ञान कल्याणक भूमी असून विपुलाचल, रत्नगिरी, उदयगिरी, स्वर्णगिरी व वैभवगिरी या पाच पहाडांसाठी प्रसिद्ध आहे.

शौर्यपुर (उत्तर प्रदेश)
यमुना नदीकिनारी वसलेले शौर्यपुर (सध्याचे बटेश्वर) हे बाविसावे तीर्थंकर नेमिनाथ यांची गर्भ व जन्म कल्याणक भूमी आहे; कल्याणक आणि सिद्धक्षेत्र असा दुर्मिळ दुहेरी योग असलेले हे मोजक्या तीर्थांपैकी एक आहे.

कुंडलपूर - नालंदा (बिहार)
नालंदाजवळील कुंडलपूर ही दिगंबर परंपरेनुसार भगवान महावीरांची जन्मभूमी असून त्यांचे प्रथम शिष्य गौतम स्वामी व तीन गणधर बंधू यांचीही जन्मभूमी येथेच आहे.
भद्रिकापुरी (भद्दिलपुर / भोंदल) - झारखंड
भद्रिकापुरी (भद्दिलपुर / भोंदल) १० वे तीर्थंकर भगवान शीतलनाथ यांचे जन्मस्थान आहे. भगवान शीतलनाथ यांच्या जीवनातील पाच प्रमुख कल्याणकांपैकी ४ कल्याणक(च्यवन/गर्भ, जन्म, दीक्षा आणि केवलज्ञान) याच भूमीत झाले आहेत.
कांपिल्यपूर (कांपिल्यजी / कंपिला)
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात स्थित कांपिल्यपूर (कांपिल्यजी) हे दिगंबर जैन परंपरेतील अत्यंत प्राचीन आणि पवित्र सिद्धक्षेत्र मानले जाते. १३ वे तीर्थंकर भगवान विमलनाथ यांचे गर्भ, जन्म, दीक्षा आणि केवलज्ञान ही ४ कल्याणके याच भूमीत पार पडली आहेत.