गुणभद्राचार्य

इ.स. ९वे शतक · दक्षिण भारत (कर्नाटक)

आचार्य गुणभद्र हे इ.स. नवव्या शतकातील दिगंबर आचार्य असून आचार्य जिनसेन (द्वितीय) व दशरथगुरू यांचे शिष्य होते. गुरू जिनसेनांनी आदिपुराण अपूर्ण ठेवून देह सोडल्यावर गुणभद्रांनी त्याची शेवटची पर्वे (४३–४७) पूर्ण केली आणि ६३ शलाकापुरुषांचे उर्वरित चरित्र 'उत्तरपुराण' रूपाने रचून 'महापुराण' पूर्ण केले. त्यांच्या शिष्य लोकसेनांनी बंकापूर येथे शक ८२० (इ.स. ८९८) मध्ये उत्तरपुराणाचा पूजामहोत्सव केल्याचा उल्लेख प्रशस्तीत आहे.

प्रमुख ग्रंथ: आदिपुराण (पर्व ४३–४७), उत्तरपुराण, आत्मानुशासन, जिनदत्तचरित.

रचलेले आगम ग्रंथ

आत्मानुशासन

आचार्य गुणभद्र यांनी रचलेल्या 'आत्मानुशासन' या ग्रंथात जीवाला आत्मस्वरूपाचे भान देऊन संसारातून मुक्त होण्याचा मार्ग श्लोकबद्ध रूपाने सांगितला आहे. यात सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र यांच्या आधारे आत्मानुशासनाचे महत्त्व विशद केले आहे.

उत्तरपुराण

उत्तरपुराण हे गुणभद्राचार्यांनी रचलेले दिगंबर जैन परंपरेतील ६३ शलाकापुरुषांचे चरित्र सांगणारे महत्त्वपूर्ण संस्कृत महाकाव्य आहे. आदिपुराणात भगवान ऋषभदेव व भरत चक्रवर्ती यांचे चरित्र आहे; उत्तरपुराणात उर्वरित २३ तीर्थंकर, ११ चक्रवर्ती, ९ बलभद्र, ९ नारायण आणि ९ प्रतिनारायण यांची चरित्रे आहेत.

उत्तरपुराण संस्कृत

गुणभद्राचार्यांच्या उत्तरपुराणाचा मूळ संस्कृत पाठ — भगवान अजितनाथांपासून महावीरांपर्यंतच्या शलाकापुरुषांची चरित्रे मूळ श्लोकांत.

पुढे: सोमदेवाचार्य →
📝 नवीनतम प्रश्नमंजुषा: दीपावली विशेष प्रश्नमंजुषा – भगवान महावीर निर्वाणसोडवा →
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान